धक्कादायक ः नगरमध्ये कोविड सेंटरच पेटवून दिले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

या आगीत हॉस्पिटलच्या आवारातील काही साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच हॉस्पिटलला आमदार संग्राम जगताप, नगरसेवक प्रकाश भागानगरे आदींनी भेट दिली. 
 

नगर ः सारसनगरमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याला नागरिकांचा विरोध होता. तरीही एका खासगी हॉस्पिटलने कोविड सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न केल्याने काही संतप्त नागरिकांनी आज रात्री साडेआठ वाजता कोविड सेंटरच्या बाहेरच्या कचऱ्याला आग लावल्याची घटना घडली आहे. या आगीत हॉस्पिटलमधील काही साहित्य जळाले. 

सारसनगर व मार्केट यार्ड परिसर हा दाट लोकवस्तीचा असून येथे कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी महापालिकेचे उपायुक्‍त डॉ. प्रदीप पठारे यांच्याकडे केली होती. परंतु, खासगी हॉस्पिटलकडून कोविड सेंटर सुरू करण्यात येत असल्याने संतप्त नागरिकांनी सेंटरच्या भिंतीला लागून असलेल्या कचऱ्याला आग लावल्याचा प्रकार घडला आहे.

या आगीत हॉस्पिटलच्या आवारातील काही साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच हॉस्पिटलला आमदार संग्राम जगताप, नगरसेवक प्रकाश भागानगरे आदींनी भेट दिली. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Kovid Center in Ahmednagar was set on fire