
श्रीरामपूर: राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवरील संघटन बळकटीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीरामपूर मतदारसंघातील १०० ठिकाणी पक्ष शाखांचे फलक उभारून या प्रयत्नांची सुरुवात माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष लहू कानडे यांच्या पुढाकारातून झाली.