सारोळे कासार ग्रामस्थांची कोविड सेंटरला लाखमोलाची मदत

सारोळे ग्रामस्थांची भाळवणीच्या कोविड सेंटरला मदत
सारोळे ग्रामस्थांची भाळवणीच्या कोविड सेंटरला मदतSYSTEM

नगर तालुका ः आमदार नीलेश लंके यांनी भाळवणी (ता. पारनेर) येथे उभारलेल्या ११०० बेडच्या कोविड सेंटरसाठी सारोळा कासार (ता. नगर) येथील ग्रामस्थांनी १ लाख ५ हजार ५५५ रुपयांचा मदत निधी जमा करून दिला. या मदतीचा धनादेश नुकताच लंके यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केला.

कोरोना संकटाच्या काळात गोरगरीब जनतेला मोफत उपचार मिळावेत, या हेतूने आमदार नीलेश लंके यांनी भाळवणी येथे ११०० बेडचे कोविड सेंटर सुरू केले. तेथे रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांबरोबर बाधित रुग्णांची ऑक्सिजन पातळी तपासणे, त्यांच्या शरीराचे तापमान मोजणे, त्यांना काय त्रास होत आहे हे जाणून घेणे, ही कामे स्वतः लंके करीत आहेत. त्यामुळे रुग्णांमध्येही सकारात्मकता निर्माण होत आहे. त्यातून त्यांना कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करण्यास बळ मिळत आहे. (Lakhs of rupees donated by Sarole Kasar villagers to covid Center)

सारोळे ग्रामस्थांची भाळवणीच्या कोविड सेंटरला मदत
पर्यटकांना मिळाली परवानगी, अकोल्यात काजवा महोत्सव होणार

सारोळा कासार ग्रामस्थांनीही स्वयंस्फूर्तीने या कामासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला व २ दिवसांत १ लाख ५ हजार ५५५ रुपयांचा मदतनिधी जमा केला. संजय धामणे, जयप्रकाश पाटील, संजय काळे, राजाराम धामणे, गोराभाऊ काळे, बाळासाहेब धामणे, गजानन पुंड, सुनील हारदे, महेश धामणे, बाळासाहेब कडूस, शहाजान तांबोळी, मच्छिंद्र धामणे, गणेश काळे, सचिन कडूस, महेश रोडे यावेळी उपस्थित होते.

आमदार नीलेश लंके यांनी सुरू केलेले हे कोविड सेंटर देशात चर्चेचा विषय ठरले आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने कोविड सेंटरसाठी मदत करीत आहे. अगदी परदेशातूनही मदतीचा हात पुढे येत आहे. मागील दोन दिवसांपूर्वी याच कोविड सेंटरमध्ये दोन जोडपी विवाहबद्ध झाली. त्यांनी रूखवतात मेडिसीन आणि मास्क, सॅनिटायझर मांडले होते. ते कोविड सेंटरलाच मद म्हणून दिले.(Lakhs of rupees donated by Sarole Kasar villagers to covid Center)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com