esakal | नांदूर मध्यमेश्वर कालव्यासाठी भूसंपादनाचा प्रश्न मार्गी
sakal

बोलून बातमी शोधा

Snehalta Kolhe

तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, तत्कालीन राज्यमंत्री विजय शिवतारे व अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी बैठका घेवून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबादचे कार्यकारी संचालक यांच्यास्तरावर पाठपुरावा केला होता.

नांदूर मध्यमेश्वर कालव्यासाठी भूसंपादनाचा प्रश्न मार्गी

sakal_logo
By
मनोज जोशी

कोपरगांवः नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्यांतर्गत वितरीका क्रमांक दोनसाठी उपवितरीका क्रमांक 4 व 5 करीता तालुक्यातील मौजे खोपडी येथील गट नंबर 62 व अन्य भूसंपादनाचे क्षेत्र खरेदी करून मोबादला निश्चितीचा 7 कोटी 71 लाख 82 हजार 500 रूपयांच्या प्रस्तावाची पूर्तता जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी शिर्डी कार्यालयाकडून करण्यात आली आहे. सदरचा प्रस्ताव गोदावरी खोरे विकास महामंडळ औरंगाबाद कार्यालयास सादर करण्यात आला.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी याकामी विधीमंडळ स्तरावर अधिवेशन काळात तारांकित प्रश्न उपस्थित करून लाभार्थी शेतक-यांची अनेक वर्षापासूनची अडचण मांडली होती. यापूर्वी लौकी आणि भोजडे येथील शेतक-यांचा भूसंपादनाचा प्रश्न निकाली काढण्यांत आला होता.(Land Acquisition for Nandur Madhyameshwar Canal)

हेही वाचा: वाडीतली पोरं सगळ्यात म्होरं ः १६ फौजदार, १४ क्लासवन अधिकारी

माजी आमदार कोल्हे व कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्यासाठी संपादित झालेल्या क्षेत्राचे पैसे अनेक वर्षापासून प्रस्ताव त्रुटी पुर्ततेच्या नावांखाली प्रलंबित असल्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, तत्कालीन राज्यमंत्री विजय शिवतारे व अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी बैठका घेवून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबादचे कार्यकारी संचालक यांच्यास्तरावर पाठपुरावा केला होता.

गोदावरी खोरे विकास महामंडळाकडून कार्यकारी अभियंता नांदूर मध्यमेश्वर जलद कालवा वैजापूर, त्यानंतर अहमदनगर जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी अहमदनगर व प्रांताधिकारी शिर्डी, तहसिलदार कोपरगांव स्तरावर सर्व शेरे पूर्तता करून 7 कोटी 71 लाख 82 हजार 500 रूपयांचा प्रस्ताव पुर्ण केला. त्यावर प्रांताधिकारी शिर्डी यांनी नांदूर मध्यमेश्वर जलद कालवा वैजापुर कार्यालयास उपवितरीका क्रमांक 4 व 5 करीता मोबदला निश्चिती बाबतचे प्रपत्र 1, दोन टक्के अस्थापना शुल्क 15 लाख 43 हजार 650 व एक टक्का सोई सुविधा शुल्क 7 लाख 71 हजार 825 ही रक्कम दोन दिवसात या कार्यालयास जमा करावी यासाठी लेखी आदेश काढले आहेत. धोत्रे, घोयेगांव, वारी अन्य गांवच्या भूसंपादित रक्कमेबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचेही कोल्हे यांनी यावेळी सांगितले.(Land Acquisition for Nandur Madhyameshwar Canal)