esakal | पुणे-नाशिक दीड तासांत! हाय स्पीड रेल्वेसाठी जमीन अधिग्रहण
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिक-पुणे रेल्वेसाठी जमीन अधिग्रहण

पुणे-नाशिक दीड तासांत! हाय स्पीड रेल्वेसाठी जमीन अधिग्रहण

sakal_logo
By
शांताराम जाधव

बोटा (अहमदनगर) ः देशातील पहिल्या सेमी हाय स्पीड पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या जमीनमोजणीला प्रत्यक्षपणे पठार भागातील खंदरमाळवाडी (ता. संगमनेर) येथून प्रारंभ करण्यात आला. यावेळी महारेल, महसूल, अभिलेख, वन व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला पुणे-नाशिक रेल्वेमार्ग पुणे- नगर- नाशिक या तीन जिल्ह्यांतून जाणार आहे. या रेल्वेमार्गावर अठरा बोगदे असून, रेल्वेचा वेग ताशी 180 किलोमीटर असेल. त्यामुळे पुणे-नाशिक प्रवासाला दोन तासांपेक्षा कमी वेळ लागणार आहे. (Land Acquisition for Pune-Nashik High Speed Railway)

हेही वाचा: वाडीतली पोरं सगळ्यात म्होरं ः १६ फौजदार, १४ क्लासवन अधिकारी

संगमनेर तालुक्‍यातील केळेवाडी, माळवाडी, बोटा, येलखोपवाडी, खंदरमाळवाडी, नांदूर खंदरमाळ, जांबूत, साकूर, जांभूळवाडी, पिंपळगाव देपा, कोळवाडे, पिंपरणे, जाखुरी, खराडी, जोर्वे, कोल्हेवाडी, समनापूर, पोखरी अशा अठरा गावांतून हा मार्ग जाणार आहे.

खंदरमाळवाडी येथे या मार्गाच्या जमीनमोजणीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. यावेळी रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाबाबत नोटीस देण्यात आलेले शेतकरी उपस्थित होते. "महारेल'चे अधिकारी सोमनाथ गुंजाळ यांनी रेल्वेमार्गाची माहिती दिली. भूसंपादनाची कार्यवाही तिन्ही जिल्ह्यांत सुरू झाली आहे. साडेसोळा हजार कोटींचा हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचा मानस असल्याचे गुंजाळ यांनी सांगितले.

(Land Acquisition for Pune-Nashik High Speed Railway)