esakal | कोकण कड्यावर फडकला सर्वांत मोठा तिरंगा
sakal

बोलून बातमी शोधा

The largest Indian flag hoisted on the Konkan ridge

मराठी चित्रपट तारका मीरा जोशी व आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक आनंद बनसोडे हे ही या मोहिमेत सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन जवळपास 45 लोकांनी या मोहिमेचा भाग होते

कोकण कड्यावर फडकला सर्वांत मोठा तिरंगा

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले: भारतीय प्रजासत्ताक दिनी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररने विक्रम केला. हरिश्चंद्रगड गडावरील कोकणकड्यावर 73 फुटी तिरंगा फडकवून राष्ट्रगीताचे गायन केले.

मराठी चित्रपट तारका मीरा जोशी व आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक आनंद बनसोडे हे ही या मोहिमेत सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन जवळपास 45 लोकांनी या मोहिमेचा भाग होते. 

हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी तिरंगा ट्रॅक्टर रॅली

नंदुरबार, धुळे, उस्मानाबाद, सोलापूर, नाशिक, नगर, पुणे, मुंबई, नांदेड येथील 45 लोकांनी 3 दिवसांच्या या ट्रेकिंग मोहिमेत सांधण दरी व हरिश्चंद्रगड सर करून 26 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजता 73 फुटी तिरंगा फडकवला.

"प्रत्येकासाठी हा अभिमानाचा क्षण असून कोकणकड्यावर तिरंगा फडकवताना अतिशय अभिमान वाटला. 360 एक्सप्लोररमार्फत अशा अनेक मोहिमा आयोजित करून साहसी खेळाच्या प्रसारासाठी काम करण्याचा मानस आहे. ही मोहीम युनायटेड नेशन्सच्या गोल्ससाठी समर्पित होती."
- आनंद बनसोडे 

संपादन - अशोक निंबाळकर

loading image