esakal | राज्यातील पहिली पालकांसाठी ऑनलाइन शाळा सुरू; अण्णा हजारेंच्या हस्ते उद्घाटन
sakal

बोलून बातमी शोधा

Launched the first online school for parents in the state

कोरोनामुळे लॉकडाउनमध्ये आयुष्य जगण्याची सगळीच गणिते बदलून गेलेली आहेत. शैक्षणिक क्षेत्र सुद्धा या बदलाला अपवाद नाही.

राज्यातील पहिली पालकांसाठी ऑनलाइन शाळा सुरू; अण्णा हजारेंच्या हस्ते उद्घाटन

sakal_logo
By
सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : कोरोनामुळे लॉकडाउनमध्ये आयुष्य जगण्याची सगळीच गणिते बदलून गेलेली आहेत. शैक्षणिक क्षेत्र सुद्धा या बदलाला अपवाद नाही. मुलांच्या शाळा बंद असल्यामुळे त्यांना घरी बसूनच अभ्यास करावा लागत आहे. त्यांच्यासाठी ऑनलाइन शाळा बहुतेक ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. 

या मुलांचा अभ्यास कसा घ्यावा, हा पालकांच्या पुढे मोठा यक्ष प्रश्न आहे. कारण मुला मुलींचे अध्ययन योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी शिक्षकांना अध्यापन कसे करावे. याचे प्रशिक्षण मिळालेले असते.  त्यासाठी डीएड आणि बीएड असे त्यांचे प्रशिक्षण झालेले असते. त्याद्वारे ते मुलांचा व्यवस्थित अभ्यास घेऊन मार्गदर्शन करू शकतात. परंतु पालकांनी मुलांचा अभ्यास घेणे हे पालकांना अत्यंत जिकिरीचे वाटत असते. 

नगर जिल्ह्यातील बातमच्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नेमकी हीच गरज ओळखून सामाजिक कार्यकर्ते कैलास लोंढे यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये सोशल मीडियावर विविध प्रकारचे प्रयोग करून पालकांसाठी वेबसाईटची निर्मिती करुन ऑनलाइन शाळा सुरू केली आहे. या ऑनलाईन शाळेला नागपूर, पुणे, सातारा, सांगली, ठाणे व मुंबई अशा सर्व विभागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ऑनलाइन शाळेचे औपचारिक उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. 

या ऑनलाईन शाळेमधून पालक आपल्या मुलांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करतील आणि स्वतःसुद्धा एक आदर्श पालक म्हणून, कृतिशील पालक म्हणून समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करतील, अशी अपेक्षा हजारे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : आदिवासी पट्ट्यात हळव्या भाताची काढणी जोरात
पालक स्वत: सोशल मीडियाचा भरपूर वापर करतात. परंतु हा वापर मुला-मुलींच्या विकासासाठी करता आला तर ती एक चांगली गोष्ट होणार आहे.  यामधून मुलांच्यावर सुद्धा मोबाईलच्या अतिरेकी वापराचे संस्कार न होता मोबाईलचा विधायक वापर कसा करता येईल, यावर सुद्धा त्यांना विशेष काम करता येईल. पालकांना या शाळेद्वारे आपल्या पाल्यांचा विकास तर करता येईलच परंतु त्यांना आयुष्य जगत असताना व्यवसायांमध्ये वाढ कशी करावी, संपत्तीमध्ये वाढ कशी करावी, सभेमध्ये भाषण कसे करावे यासंह अन्य विविध विषयांचे कृतीशील मार्गदर्शनही मिळणार आहे.

आठवड्यातून एकदा झूम मिटिंगद्वारे प्रत्यक्ष संवाद साधून मुलामुलींच्या समस्यावर उपाय सापडवता येणार असल्याचे उपक्रमाचे प्रमुख कैलास लोंढे यांनी सांगितले.
या अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यानंतर दोनच सत्रांमध्ये मला मुलांचा अभ्यास कसा घ्यावा याचे तंत्र समजले. हा अभ्यासक्रम पालकांसाठी खूपच उपयुक्त असून प्रत्येक पालकाने याचा लाभ घेतला पाहिजे असे आवाहन या कोर्सचे एक लाभधारक पालक नागपूर येथील टॅक्स प्रॅक्टिशनर सुभाषचंद्र चौधरी यांनी केले आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image