
अहिल्यानगर: पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी परीविक्षाधिन पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या विशेष पथकाने गेल्या महिनाभरात तब्बल ५८ ठिकाणी छापे घालून २६९ आरोपी जेरबंद केले आहेत. तसेच या कारवाईत पाच कोटी ९७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक घार्गे यांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.