बिबट्याने सोडला लॉकडाउनचा उपवास, कसा ते वाचा...

 Leopard attack
Leopard attack

कोपरगाव ः  कोरोना संसर्गामुळे बरेच दिवस लोकांनी लॉकडाउन पाळला. त्या काळात जनावरेही शेतात फार काळ नेली जात नव्हती. या परिसरात बिबट्या असल्याने पुरेपुर काळजी घेतली जात होती. मात्र आता शेतकर्यांसह सर्वच निरधास्त झालेले आहेत. या काळात लोकांसह बिबट्यालाही उपवास घडला असवा. मात्र अाज त्याने ती कसर भरून काढत आपला उपवास सोडला.

डाऊच खुर्द येथील गुरसळ वस्तीजवळ अर्जुन होन यांच्या मालकीच्या तीन शेळ्या, दोन बोकड बिबट्याने आज पहाटे फस्त केले. वन विभागाने पिंजरा लावण्यात दिरंगाई केल्याने होन यांचे हे नुकसान झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

आमदार आशुतोष काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. शेतकऱ्याला जास्तीत जास्त मोबदला देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

डाऊच खुर्द येथील गुरसळ वस्तीजवळ अर्जुन होन यांच्या मालकीच्या पाच शेळ्या व दोन बोकडांवर आज पहाटे बिबट्याने हल्ला केला. होन यांनी कर्जावर शेळीपालन व्यवसाय सुरू केला होता.

या घटनेत त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, दोन महिन्यांपासून डाऊच, चांदेकसारे परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केल्या होत्या. मात्र, त्याकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 

कावळ्याच्या पिलाला सर्पमित्रामुळे जीवदान 

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात कावळ्याचे घरटे उद्‌ध्वस्त झाले. कुटुंबापासून ताटातूट होऊन दोन पिले जमिनीवर कोसळली. एकाचा मृत्यू झाला. मुंग्यांनी त्यावर ताव मारायला सुरवात केली. दुसऱ्याच्या पंखाला इजा झाली होती. पोटच्या पिलांची अवस्था पाहून त्याच्या माता-पित्याचा आवाज काळजाला भिडत होता. त्यामुळे कावळ्यांची तेथे एकच गर्दी झालेली. ही बाब येथील सर्पमित्र रमेश भोंगळ यांच्या निदर्शनास आली. त्यांनी कावळ्याच्या पिलावर औषधोपचार केले. आता हे पिलू सावरले असून, त्याच्या गगनभरारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


तालुक्‍यातील सुरेगाव येथील गोदावरी उजव्या कालव्यालगतच्या आंब्याच्या झाडावर कावळ्याचे घरटे होते. वादळी वाऱ्यात घरटे मोडले. कावळ्याची दोन्ही पिले जमिनीवर पडली. त्यातील एकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्याच्या पंखास इजा झाल्याने त्यास भरारी घेणे अशक्‍य झाले. कावळ्यांची जोडी "काव.. काव..' करीत पिलाजवळ जाणाऱ्यांना टोचा मारून त्याचे चोवीस तास रक्षण करत होती. त्यांचा आक्रोश व त्यांच्या दुःखात साथ देणाऱ्या इतर कावळ्यांचा किलबिलाट हृदयाला पाझर फोडत होता. 

ही बाब सर्पमित्र भोंगळ यांच्या लक्षात आली. जखमी पिलास दत्तू शिंदे यांच्या मदतीने बारदाण्यात गुंडाळून भोंगळ यांनी घरी आणले. कोळपेवाडीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. किरण खर्डे यांनी जखम साफ करून औषधोपचार केले. आठ दिवसांनंतर जखम बरी झाली. आता पिलू गगनभरारी घेण्याच्या तयारीत असल्याचे भोंगळ यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com