

Leopard Attack Claims Child’s Life; MLA Hands Over Government Aid Letter
Sakal
संगमनेर : नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर संगमनेर येथे परतताच आमदार अमोल खताळ यांनी जवळे कडलग (ता. संगमनेर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या सिद्धेश सूरज कडलग या बालकाच्या घरी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन करत धीर दिला. वन विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या २५ लाख रुपये मदतीचे पत्र आमदार खताळ यांच्या हस्ते सिद्धेशचे वडील सूरज कडलग यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.