Maharashtra wildlife: मोठा अनर्थ टळला असला तरी या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करत होते. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
राहुरी : चेडगाव परिसरात मागील चार दिवसात बिबट्यांच्या हल्ल्याच्या चार घटना घडल्या. नशीब बलवत्तर म्हणून चारही जण बचावले. चेडगाव येथे मुळा उजवा कालवा परिसरात तसेच पोईचा महादेव मंदिर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.