Leopard Attacks : राहुरीत बिबट्यांचे हल्ले वाढले: अकरा महिन्यांत दोन जणांचा मृत्यू; ४३१ शेतकऱ्यांची जनावरे ठार
Ahilyanagar : राहुरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात वडनेर येथे आज (सोमवारी) शेतकरी शोभाचंद सीताराम गव्हाणे (वय ४९) ठार झाले. त्यापूर्वी वरवंडी येथे २३ मे २०२४ रोजी वेदिका श्रीकांत ढगे (वय ३) ही चिमुरडी मुलगी ठार झाली.
Leopard attacks have increased in Rahuri, leading to fatalities and significant losses of livestock in the past 11 months.Sakal
राहुरी : तालुक्यात मागील ११ महिन्यांत बिबट्यांनी ४३१ शेतकऱ्यांची जनावरे ठार केली. पाच जणांना गंभीर जखमी केले. आजच्या घटनेसह दोन जणांचा मृत्यू झाला, तर मारलेले भटकी श्वान, मांजर, डुकरांची संख्या एक हजारांवर आहे.