esakal | कसं काय झालं...मेलेलं कुत्र झाडाच्या शेंड्यावर चढलं
sakal

बोलून बातमी शोधा

The leopard hunted the dog on the top of the tree

उंच झाडावर मृत कुत्रे पाहून शेतकऱ्यांत घबराट पसरली आहे. दोन किंवा त्याहून बिबटे असावेत, असा अंदाज रहिवाशांचा आहे. वन विभागाने तातडीने दखल घेऊन येथे पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे.

कसं काय झालं...मेलेलं कुत्र झाडाच्या शेंड्यावर चढलं

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

राहाता ः तालुक्यात दररोज विचित्र प्रकार पहायला मिळत आहेत. दोन कुत्री मरून पडलेली दिसली तर एक कुत्रे थेट झाडाच्या शेंड्यावर चढलेले दिसले.त्यामुळे लोक हबकून गेले आहेत.

पिंपळस शिवारात गोदावरी कालव्याच्या कडेला बिबट्याने मुक्काम ठोकला. आज त्याने दोन कुत्र्यांचा फडशा पाडला. मारलेले तिसरे कुत्रे झाडावर उंच नेऊन ठेवले. असा प्रकार पहिल्यादांच पाहायला मिळाला.

उंच झाडावर मृत कुत्रे पाहून शेतकऱ्यांत घबराट पसरली आहे. दोन किंवा त्याहून बिबटे असावेत, असा अंदाज रहिवाशांचा आहे. वन विभागाने तातडीने दखल घेऊन येथे पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे. 

जमिनीपासून सुमारे 20 फूट उंच झाडावर बिबट्या जबड्यात कुत्रे धरून चढला. झाडाच्या टोकाकडच्या फांदीवर त्याने आपली शिकार ठेवली. एवढ्या मोठ्या वजनाची शिकार तोंडात धरून तो लिलया झाडावर चढू शकतो. वेळप्रसंगी झाडावर वास्तव्यही करू शकतो. कालव्याच्या कडेला उंच झाडी आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. 
गोदावरी कालव्याच्या कडेने राहाता शहरातील अनेक रहिवासी सकाळ-सायंकाळ फिरायला जातात.

हा रस्ता महत्वाचा असल्याने, या भागातील शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते. सततच्या पावसामुळे कालव्याच्या कडेला डोक्‍याहून अधिक उंच गेलेल्या वनस्पतींचे लपण झाले आहे. त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित जागा या वनस्पतींमुळे तयार झाली आहे. गेल्या आठ दिवसांत या भागातील भटकी कुत्री फस्त करण्याचा धडाका बिबट्यांनी लावला आहे.अहमदनगर 

संपादन - अशोक निंबाळकर

loading image