अकोले तालुक्यातील नवलेवाडीत बिबट्याचा वावर

Leopard in Navlewadi in Akole taluka
Leopard in Navlewadi in Akole taluka

अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्यातील नवलेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अमृतनगर व कॉलेज परिसरात बिबट्या दिसला आहे. बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने गांभीर्याने लक्षात घेऊन तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रोहित संजय देशमुख हॉटेलहून घरी परतत असताना अमृतनगर परिसरात केशवराव नाईकवाडी व संकेत येलमामे यांच्या बंगल्यांमधील रस्त्याने टर्न घेतल्यावर बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव सांगळे व प्रकाश आरोटे यांच्या बंगल्यांच्या दरम्यान रात्री साडेबाराच्या सुमारास बिबट्या दिसला. रोहितने दुचाकीचा हॉर्न वाजवल्यानंतर बिबट्या सुनिल मंडलिक यांच्या बंगल्यासमोर असलेल्या तुषार नेहे यांच्या बंगल्याकडे मधल्या गल्लीत गेला. परंतु रोहित एकटाच होता आणि वेळही रात्रीची असल्याने त्याने आपली दुचाकी ताबडतोब फिरवून दुसऱ्या मार्गाने घरी गेला.

त्यानंतर या बिबट्याने आपला मोर्चा कॉलेज परिसराकडे वळवला. तेथे माजी प्राचार्य मोरे यांचे चिरंजीव हेमंत मोरे यांच्या दोन महिन्याच्या पाळीव डॉलीला (कुत्री) अलगद उचलून नेले. त्यांच्या बंगल्याजवळ बिबट्याचे स्पष्ट ठसे आढळून आले आहेत. काही दिवसांपूर्वी हा बिबट्या सायंकाळी उशिरा गणपती मंदिर परिसरात आरामात फेरफटका मारत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com