

Forest department personnel installing leopard cages in villages near Digras nursery amid rising wildlife concerns.
Sakal
-विलास कुलकर्णी
राहुरी : राहुरी, नगर तालुका, श्रीरामपूर, राहाता व कोपरगाव या पाच तालुक्यांमध्ये पिंजऱ्यात अडकले ११ बिबटे डिग्रस (ता. राहुरी) येथे वन खात्याच्या रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये ७ नर आणि ४ मादी बिबट्यांचा समावेश आहे. एक महिन्यापासून हे बिबटे नैसर्गिक अधिवासात मुक्त होण्याची वाट बघत आहेत.