

Leopard captured in CCTV camera while roaming near houses at Kothawale Vasti.
Sakal
राहुरी: पाथरे खुर्द येथील कोठावळे वस्तीपर्यंत बिबट्या आला. घराच्या पडवीत आणि अंगणात फिरून त्याने भक्ष्याचा शोध घेतला. बिबट्याच्या या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. ही घटना आज पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.