
राहुरी : वडनेर येथे बिबट्या काल रात्री नऊ वाजता वन खात्याच्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे वन खात्यासह परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु काल दिवसभरात वडनेर येथे माळवाडी परिसरात एक बिबट्या व वडनेर-कणगर शिव रस्त्यावर एक बिबट्या नागरिकांनी पाहिला. सोमवारी पहाटे शेतकऱ्याला बिबट्याने ठार केले होते.