Leopard Attack : नातवावर बिबट्याची झडप! 'येसगावात आजोबाची बिबट्याशी ‘फाईट’; जोरदार प्रतिकार करून वाचविले प्राण
Leopard Attacks in Yesgaon: बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय कुणाल अजय आहेर हा चिमुकला गंभीर जखमी झाला. त्याला बिबट्या उसाच्या शेतात खेचून नेत होता. हे पाहून त्याचे आजोबा मच्छिंद्र आहेर यांनी क्षणार्धात बिबट्यावर झडप घातली. या अनपेक्षित प्रतिकारामुळे बिबट्या विचलित झाला अन् घाबरून पळून गेला.
कोपरगाव : नातवावर झडप घालून त्याला घेऊन उसाच्या शेतात निघालेल्या बिबट्यावर आजोबांनी झेप घेतली. जोरदार प्रतिकार करून त्याचे प्राण वाचविले. आजोबांची ही धाडसी झेप पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरली.