
टाकळी ढोकेश्वर : पिंपळगाव तुर्क (ता. पारनेर) कन्हेरओहळ परिसरातील शिवारात गेल्या काही दिवसांपासून वावर असलेल्या बिबट व त्याच्या बछड्यांना जेरबंद करण्यास ग्रामपंचायत आणि वन विभागाला यश आले आहे. या भागात बिबट्याचे वास्तव्य असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते.