

Leopard Movement Raises Alarm in Rashi Village Area
Sakal
राशीन: राशीन-कर्जत रस्त्यावरील चिंदादेवी परिसरातील लोकवस्तीत बिबट्याचे चार बछडे दिसून आल्याने राशीनसह परिसरात भीतीचे वातावरण आहे. याबाबत ग्रामस्थांनी वन विभागास कळविले आहे. या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांवर ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी गांभीर्याने सतर्क आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मालोजीराजे भिताडे यांनी केले आहे.