esakal | जलसंधारणमंत्री गडाखांच्या वस्तीवर बिबट्याचा वावर; वन विभागाने लावला पिंजरा
sakal

बोलून बातमी शोधा

Leopards at the house of Water Conservation Minister Shankarrao Gadakh in Sonai

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सोनई येथील राहत्या वस्तीजवळ सलग दोन दिवस बिबट्याचे दर्शन झाले असून यामुळे परीसरात धाकधूक वाढली आहे.

जलसंधारणमंत्री गडाखांच्या वस्तीवर बिबट्याचा वावर; वन विभागाने लावला पिंजरा

sakal_logo
By
विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सोनई येथील राहत्या वस्तीजवळ सलग दोन दिवस बिबट्याचे दर्शन झाले असून यामुळे परीसरात धाकधूक वाढली आहे.

मंत्री गडाख यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील रस्त्याने युवा नेते उदयन गडाख व नितीन काळे शनिवारी (ता. २१) रात्री घराकडे जात असताना शेजारच्या ऊसातून आवाज आल्याने त्यांनी आपली मोटार थांबवली. घराच्या डाव्याबाजूने बिबट्या उजव्या बाजूच्या शेतात जाताना गडाख व काळे यांनी बघीतले. त्यांनी पळालेला बिबट्या आपल्या मोबाईलमध्ये अचूक टिपला आहे. दोन दिवसापूर्वी घराच्या दोनशे मीटर अंतरावर बिबट्या दिसला होता.

सलग दोन दिवस बिबट्या दिसल्यानंतर वन विभागास माहिती देण्यात आली. आज मंत्री गडाख यांच्या राहत्या घराजवळ पिंजरा लावण्यात आला आहे. नऊ महिन्यापूर्वी याच वस्तीजवळ वन विभागाच्या पिंज-यात बिबट्या अडकला होता.सलग दोन दिवस बिबट्या दिसल्याने परीसरात भीतीचे वातावरण झाले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image