
राहुरी : तालुक्यात बुधवारी एकाच दिवशी तीन बिबटे वन खात्याच्या पिंजऱ्यात अडकले आहेत. विशेष म्हणजे चिंचाळे येथे एकाच पिंजऱ्यात दोन बिबटे अडकले, तर राहुरी फॅक्टरी येथे वाणी मळ्यात एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला. तिन्ही बिबट्यांना डिग्रस येथे वन खात्याच्या रोपवाटिकेत हलविण्यात आले आहे.