‘मौलाना आझाद’ची अंमलबजावणी करा; मुस्लीम आरक्षण कृती समितीचे मंत्री मलिक यांना निवेदन

गौरव साळुंके
Monday, 24 August 2020

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळातर्फे अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी कर्ज योजनेची अंमलबजावणी करावी, या मागणीचे निवेदन मुस्लीम युवक आरक्षण अधिकार कृती समितीच्या वतीने प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या मार्फत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना पाठविण्यात आले.

श्रीरामपूर (अहमदनगर) : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळातर्फे अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी कर्ज योजनेची अंमलबजावणी करावी, या मागणीचे निवेदन मुस्लीम युवक आरक्षण अधिकार कृती समितीच्या वतीने प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या मार्फत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना पाठविण्यात आले. 

महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून महामंडळाच्या योजनांवर अंमलबजावणी होत नसल्याने गरजूना लाभ मिळत नाही. 

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अधिक सक्षमीकरण करुन अल्पसंख्याक तरुणांना शिक्षण आणि रोजगार देण्यासाठी महामंडळाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मागणी निवेदनात नमुद केली आहे. मागणीचे निवेदन फय्याज इनामदार, अॅड. समीन बागवान, जावेद पठाण, शरीफ शेख, अॅड. अस्लम शेख, डॉ. रिय्याज पटेल, श्रीकृष्ण बडाख, जीवन सुरुडे यांनी प्रांताधिकारी अनिल पवार यांनी आज दिले.

संपादन : अशोक मुरुमकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Letter of demands to Nawab Malik Minister of Muslim Reservation Action Committee