Ahilyanagar News: 'बाटली आडवी, तळीरामांची धुलाई'; लिंगदेवमध्ये दारुविक्रेत्याच्या घरावर हल्ला,महिलांनी घेतले रणरागिनीचे रूप
Women’s Outrage in Lingdev: काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अकोले तालुका महिला आघाडीच्या सचिव व ग्रामपंचायत सदस्य कल्पना हरिभाऊ फापाळे यांनी अनेक वेळा ग्रामसभेत व ग्रामपंचायतीमध्ये लिंगदेव गावातील अवैध दारू व गुटखा विक्रीविरोधात अर्ज देत बंद करण्याची मागणी केलेली आहे.
Lingdev women protesting against liquor sale, storm liquor seller's home in fiery outrage.Sakal
अकोले: लिंगदेव (ता. २४ ) येथे आषाढ अमावस्येच्या दिवशी संतप्त महिलांनी दारुविक्रेत्याच्या घरावर हल्ला करत दुकानाची तोडफोड केली. यावेळी तळीरामांचीही धुलाई करण्यात आली. या आंदोलनात महिला रणरागिणींच्या रूपात दिसून आल्या.