खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गजाआड

गौरव साळुंके 
Tuesday, 26 January 2021

शहर पोलिसांकडुन अनेक महिन्यांपासून त्याचा शोध सुरु आहे. परंतु, काळे पोलिसांना सापडत नसल्याने अखेर सहा महिन्यानंतर पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार निरिक्षक अनिल कटके यांच्या पथकाने काळेचा शोध घेतला.

श्रीरामपूर (अहमदनगर) : शहरातून बेड्यासह पसार झालेला खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी सचिन काळे याला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

तालुक्‍यातील मुठेवाडगाव परिसरात सात महिन्यापूर्वी खून झाला होता. या प्रकरणी संशयित आरोपी सचिन नेमाजी काळे (वय 39, रा. मुठेवाडगाव) याला येथील ग्रामीण रुग्णालयातून वैद्यकीय तपासणीनंतर कारागृहात घेवून जाताना पोलिसांना चुकारा देत हरेगाव रस्त्यासमोर पोलिस व्हॅनचा मागिल दरवाजा उघडून बेड्यासह तो पसार झाला होता. पोलिस शिपाई दत्तात्रय शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शहर पोलिसांकडुन अनेक महिन्यांपासून त्याचा शोध सुरु आहे. परंतु, काळे पोलिसांना सापडत नसल्याने अखेर सहा महिन्यानंतर पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार निरिक्षक अनिल कटके यांच्या पथकाने काळेचा शोध घेतला. तेव्हा काळे हा वास्तव्य बदलून नारायणगाव (जि. पुणे) येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहायक पोलिस निरिक्षक शिशिर देशमुख, पोलिस फौजदार गणेश इंगळे, पोलिस हवालदार भाऊसाहेब काळे यांनी सचिन काळेला अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The local crime branch has succeeded in nabbing the absconding accused in the murder case in Shrirampur