हरिश्चंद्र गडावरील विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती चोरीला; भर दुपारी चोरी झाल्याचे उघड !

शांताराम काळे 
Wednesday, 9 December 2020

आठ दिवसापूर्वी भर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात चोरटयांनी गडावरील शांततेचा फायदा घेत मुख्य मंदिराच्या शेजारी असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दोन्ही मूर्ती काढून नेल्या. 

अकोले (अहमदनगर ) : हरीशचंद्र गडावरील विठ्ठल रुक्मिणी मूर्ती भर दुपारी चोरीला गेल्यामुळे राजूर पोलिसांकडे व पुरातत्व खात्याकडे स्थानिक पाचनई ग्रामस्थांनी तक्रार दाखल केली. याचा तपास करण्याची मागणी ग्रामपंचायतीचे कि विकास वन समितीचे अध्यक्ष चंदर भारमल व ग्रामस्थांनी केली आहे. आठ दिवसापूर्वी भर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात चोरटयांनी गडावरील शांततेचा फायदा घेत मुख्य मंदिराच्या शेजारी असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दोन्ही मूर्ती काढून नेल्या. 

हे ही वाचा : नेवाशातील कार्तिक एकादशी यात्रोत्सव रद्द ; संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचा निर्णय

सकाळ दहा वाजता कळसुबाई हरीशचंद्र गड अभयारण्याचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे वनक्षेत्रपाल दत्तात्रय पडवळ व वनसमितीचे अध्यक्ष चंदर भारमल, गंगाराम घोगरे, कुंडलिक भारमल, माणिक खोडके, भास्कर बादड, किसन खोडके व गडावर टपऱ्या टाकलेले व्यवसायिक यांची मंदिराच्या बाहेर बैठक घेऊन तेथील अतिक्रमण काढण्याचे काम सुरु असताना मंदिरातून भर दुपारी साडेबाराला मूर्ती चोरीला गेल्या. याबाबत ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने शोधाशोध केली. मात्र मूर्ती सापडल्या नाहीत मग पुरातत्व खाते नगर यांना कळवून दुसऱ्या दिवशी सकाळी राजूर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. मात्र पुरातत्व विभाग याबाबत या मूर्तीची स्थापनाबाबत आमच्या टँपो नकाशात नसल्याचे म्हणतात.

हे ही वाचा : पारनेर तालुका दूध संघातील 51 लाखांची चोरी झाकण्यासाठी संघाच्या माजी अध्यक्षांची न्यायालयात धाव : दादासाहेब पठारे

मात्र मूर्ती त्या पुरातन व दगडी नक्षीकाम केलेल्या होत्या. दर शिवरात्री व एकादशीला ग्रामस्थ अखंड हरिनाम सप्ताह बसवत असे. आमचे श्रद्धास्थान असून पुरातत्व खाते दुर्लक्ष्य करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तर अभयारण्य सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी मूर्ती चोरीस गेल्याचे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. तर सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी या चोरीबाबत तपास सुरु केला आहे. तर पुरातत्व विभागाचे निरीक्षक श्री. पवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मुख्य मंदिर व मूर्तीची दुरावस्था झाली असून हे खाते याबाबीकडे दुर्लक्ष्य करत असून मूर्ती चोरीबाबत त्याची उदासीनता दिसून येत आहे. चोरीचा तपास लागावा म्हणून ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींनाही साकडे घातले. मात्र, आठ दिवस उलटूनही जैसे थे परिस्थिती असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Local Pachanai villagers have lodged a complaint with Rajur Police and Archaeological Department over the theft of Vitthal Rukmini idol from Harishchandra fort