राष्ट्रीय सुरक्षा स्पर्धेत एल. अँड टी.ला कामगारांना पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 December 2020

मंगळवार ( ता. 8 डिसेंबर) रोजी आयोजित या राष्ट्रीय सुरक्षा स्पर्धेत कार्यस्थानच्या सुरक्षिततेमध्ये उत्कृष्टता या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपनीच्या प्रतिनिधींनी सादरीकरण केले.

नगर ः भारतीय उद्योग संघातर्फे आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय सुरक्षा स्पर्धेत येथील लार्सन अँड ट्यूब्रो कंपनीच्या सागर ससाणे, राजू झरेकर व महेश कवडे यांच्या सादरीकरणाला रौप्य पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. 

मंगळवार ( ता. 8 डिसेंबर) रोजी आयोजित या राष्ट्रीय सुरक्षा स्पर्धेत कार्यस्थानच्या सुरक्षिततेमध्ये उत्कृष्टता या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपनीच्या प्रतिनिधींनी सादरीकरण केले.

त्यामध्ये नगर येथील एल अँड टी इलेक्‍ट्रिकल अँड ऑटोमेशन ए युनिट ऑफ स्नायडर इलेक्‍ट्रिकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे वरीष्ठ अधिकारी सागर ससाणे, राजू झरेकर व महेश कवडे यांनी केलेल्या सादरीकरणाला रौप्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या साठी कंपनीचे उपसरव्यवस्थापक राजेंद्र नाईकवाडी, धनंजय कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. तर प्लान्ट हेड दिलीप आढाव, सरव्यवस्थापक अरविंद पारगावकर आणि उपाध्यक्ष उदय सिंग यांनी कौतुक केले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: L.T. Silver awards to company workers