
Shri Kshetra Bhavangad receives 4 hectares of land after government approval following Mahant’s plea.
Sakal
पाथर्डी: तालुक्यातील श्री क्षेत्र भगवानगडाच्या विकासासाठी केंद्र सरकारने वन विभागाची चार हेक्टर जागा देण्यास मान्यता दिली आहे. यामुळे सध्या भगवानगडावर सुरू असलेल्या विकासकामांना आणखी वेग येणार आहे. केंद्रीय वन विभागाच्या मालकीची असलेली काही जागा गडाच्या विकासासाठी मिळावी, अशी मागणी भगवानगडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करत सातत्याने पाठपुरावा केला होता.