Shevgaon : तिसऱ्या दिवशीही शेवगावात ‘बंद’; आरोपींना अटक करण्याची मागणी

एका गटासह व्यापाऱ्यांच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ही मिरवणूक शांततेत सुरू असताना एका ठिकाणी तिच्यावर दगडफेक झाली
maharashtra communal violence situation in shevgaon internet suspended demand to arrest accused
maharashtra communal violence situation in shevgaon internet suspended demand to arrest accusedsakal
Updated on

शेवगाव : येथे रविवारी रात्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत झालेल्या दगडफेकीचे पडसाद आज तिसऱ्या दिवशीही कायम होते. या प्रकरणातील आरोपींवर कारवाई व्हावी, अशी मागणी दोन्ही गटांनी अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्याकडे केली आहे.

एका गटासह व्यापाऱ्यांच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ही मिरवणूक शांततेत सुरू असताना एका ठिकाणी तिच्यावर दगडफेक झाली. या वेळी घोषणा देत सशस्त्र हल्ला झाला. दंगलखोरांनी परिसरात हल्ला चढवून नुकसान केले.

वाहनांची तोडफोड केली. मारवाड गल्ली, जैन गल्ली, धनगर गल्ली, वडार गल्ली, भाडाईत गल्ली, राम मंदिर बोळ या भागातील महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ झाली. त्यामुळे महिला दहशतीखाली आहेत.

maharashtra communal violence situation in shevgaon internet suspended demand to arrest accused
Shevgaon : शेवगावात तणावपूर्ण शांतता; ३१ जण पोलिसांच्या ताब्यात, शहरात ‘बंद’

तसेच, पैठण रस्ता, क्रांती चौक, मिरी रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांनादेखील मारहाण करण्यात आली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सर्व हातगाड्या, पाल टाकून बसणारे दुकानदार,

पान व मावा टपऱ्या काढून टाकाव्यात. शहरातील शनिमारुती मंदिराशेजारील अनधिकृत कत्तलखाने व तेथे होणारी गोवंशहत्या त्वरित बंद करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.दुसऱ्या गटाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मिरवणूक ठरावीक ठिकाणी आल्यानंतर पूर्वनियोजित व जाणीवपूर्वक विचित्र प्रकारच्या घोषणा देऊन दगडफेक केली, तसेच धार्मिक स्थळात येऊन ज्येष्ठ व्यक्तींना जातिवाचक शिवीगाळ केली.

maharashtra communal violence situation in shevgaon internet suspended demand to arrest accused
Ahmednagar : तेरा गावांमधील शेतकरी आक्रमक, प्रशासन नरमले; ग्रामस्थांमुळे वाळू डेपो निविदा स्थगित

दानपेटी फोडून त्यातील सुमारे ४० ते ५० हजार रुपये लंपास केले. दोन्ही निवेदनांवर शेकडो नागरिक, व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी दोन्ही गटांशी चर्चा केली. शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपरिषदेने सुरवात केल्यास त्यांना त्वरित बंदोबस्त देण्यात येईल, अशी ग्वाही अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली.

प्रमुख पक्षांचे पदाधिकारी गुन्ह्यात अडकले

शेवगाव दगडफेकप्रकरणी पोलिसांनी ११२ जणांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा व कर्मचाऱ्यांस मारहाण, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, अशा गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण, तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, मनसेचे तालुकाप्रमुख गणेश रांधवणे, शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख आशुतोष डहाळे, माजी नगरसेवक सागर फडके, कैलास तिजोरे, बाजार समितीचे संचालक जाकिर कुरेशी, कम्युनिस्ट पक्षाचे संजय नांगरे आदींसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पोलिस प्रशासनाने ३८ जणांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com