
"Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil inspecting flood-hit Mohari and Daradwadi, assuring farmers of timely relief."
Sakal
जामखेड: तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतपिके, शेतजमीन, ओढे, नाले व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संकटाच्या काळात शासन नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभे असून, नुकसानीच्या पंचनाम्यानंतर मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.