
Residents of Shanishingnapur celebrate the dissolution of ‘Shanaishwar’ trust board with fireworks.
esakal
सोनई : कर्मचारी भरतीत असलेली अनियमितता, कोट्यावधी रुपयांचा ऑनलाईन अॅप घोटाळा व आर्थिक घोटाळ्याचे मुद्दे चर्चेत असताना आज सोमवार (ता.२२) शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ अचानक बरखास्त करण्यात आले. उपविधी सल्लागार व उपसचिव सागर ज. बेंद्रे यांची सही असलेला शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला.