
Govt Pledges Support for Flood-Hit Farmers, Assures Agriculture Minister Bharane
Sakal
शेवगाव: अतिवृष्टीमुळे राज्यात ८३ लाख हेक्टर, तर अहिल्यानगर जिल्ह्यात ७ लाख ४९ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापैकी जवळपास ८० टक्के म्हणजे ६ लाख ३४ हेक्टर शेतीचे नुकसान एकाच महिन्यात झाले आहे. अतिवृष्टी व महापुराने तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची घरे, पिके, पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.