
Harshvardhan Sadgir celebrates his victory as Maharashtra Kesari at the grand wrestling event in Yashodhan Patangan.
Sakal
संगमनेर: आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त संगमनेरच्या यशोधन पटांगणावर भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेला राज्यभरातील नामांकित मल्लांनी मोठा प्रतिसाद दिला. चुरशीच्या २१७ लढतीमध्ये शौर्य, ताकद आणि डावपेचांची जुगलबंदी पाहायला मिळाली.