

Shrirampur Police bust soybean theft gang; four arrested, one still absconding.
Sakal
श्रीरामपूर : शेतकऱ्यांचे सोयाबीन, तसेच मेंढ्या, बोकड व शेळ्या चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा श्रीरामपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चार आरोपींना अटक करण्यात आली असून, एक फरार आहे. सुमारे ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई अप्पपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.