महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे बाराशे कर्मचारी संपामध्ये सक्रिय सहभागी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahuri University Employee

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दहा जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे बाराशे कर्मचारी आज संपामध्ये सक्रिय उतरले.

Pension March : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे बाराशे कर्मचारी संपामध्ये सक्रिय सहभागी

राहुरी विद्यापीठ - महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दहा जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे बाराशे कर्मचारी आज संपामध्ये सक्रिय उतरले. सरकारी निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन व राज्यव्यापी संपात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सक्रिय सहभागी झाले.

तसेच जुनी पेन्शन योजना लागू असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ही काळ्याफिती लावून बेमुदत काम बंद राज्यव्यापी संपास पाठिंबा दिला. पदव्युत्तर महाविद्यालयाच्या प्रांगणापासून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वारामार्गे प्रशासकीय इमारतीपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी मोर्चा नेला. प्रशासकीय इमारतीसमोर दिवसभर बसून ठिय्या आंदोलन केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाचे उपाध्यक्ष डॉ. उत्तम कदम, सचिव मच्छिंद्र बाचकर, खजिनदार गणेश मेहत्रे, सोबत गोरक्षनाथ शेटे, महेश घाडगे, दत्तात्रय कदम व डॉ. संजय कोळसे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाचे कुलसचिव प्रमोद लहाळे यांना संपामध्ये सहभागी होत असल्याचे निवेदन दिले.