crime
sakal
श्रीरामपूर : जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या पिंपरी निर्मळ येथील बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी मोठी झेप घेतली. या रॅकेटला विनापरवाना सोनोग्राफी मशीन पुरविणाऱ्या ‘पुणे कनेक्शन’चा पोलिसांनी छडा लावला. पुण्याच्या दोन डॉक्टरांसह एका एजंटाला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे गुन्ह्यातील अटक केलेल्या आरोपींची संख्या आता १६ झाली आहे. त्यात पाच डॉक्टरांचा समावेश असल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.