

Vehicles stuck for hours on the Kopargaon–Ahilyanagar highway as a massive traffic jam halts evening movement till late night.
Sakal
शिर्डी: नगर ते कोपरगाव या अंतरातील महामार्गाचे काम करणा-या ठेकेदार कंपन्यांना जाब विचारण्याची तसदी संबंधित सर्व लोकप्रतिनिधी का घेत नाहीत? जड वाहतूक अन्य मार्गे वळवून देखील या रस्त्याच्या कामाला वेग का येत नाही? किमान खड्डे तरी बुजवावेत, यासाठी महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी पुढाकार का घेत नाहीत? याची उत्तरे मिळत नसल्याने दिवाळी सुटीत साईदर्शनासाठी आलेल्या भाविकांवर या रस्त्यावर चक्का जामचा संतापजनक अनुभव वारंवार येत आहे.