

Mamtabai Bhangare proudly displaying the five-foot organic bottle gourd grown through her innovative natural farming techniques.
Sakal
अकोले: येथील फूड मदर ममताबाई भांगरे यांनी उत्पादीत केलेल्या पाच फुटांच्या दुधी भोपळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरवर्षीप्रमाणे ममताबाईंनी यंदाही आपल्या शेतामध्ये विविध पिकांची लागवड करून त्यांचे बियाणे पुढील हंगामासाठी निर्माण करण्यासाठी जोरदार तयारी केली.त्यांनी यंदाच्या खरीप हंगामामध्ये लागवड केलेल्या गावरान दुधी भोपळ्यांना मोठ्या प्रमाणावर फळे लागली आहेत.