आजारपण घालवण्यासाठी अंगारे-धुपारे, भोंदूबाबाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम न्यूज

आजारपण घालवण्यासाठी अंगारे-धुपारे!भोंदूबाबाला अटक

संगमनेर ः मागील अनेक वर्षांपासून शारीरिक व्याधींनी त्रस्त असलेल्या 45 वर्षांच्या विवाहित महिलेवर वारंवार अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबास संगमनेर तालुका पोलिसांनी अटक केली. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावित्रा बाबूराव गडाख (वय 55, रा. पारेगाव बुद्रुक, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे.

(Man arrested for torturing woman in Sangamner taluka)

हेही वाचा: अजितदादांना लागली नीलेश लंकेंच्या आरोग्याची काळजी

महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मागील काही वर्षांपासून असलेल्या शारीरिक व्याधींवर रुग्णालयात उपचार घेतले; मात्र आराम मिळत नसल्याने माहेर असलेल्या पारेगाव येथील सावित्रा गडाख या बाबाकडे भावाबरोबर उपचारासाठी गेले. त्याने ताईत, अंगारे-धुपारे करीत उपचार केले.

प्रकृतीत सुधारणा होत असल्याने पतीसह अनेकदा बाबाच्या दरबारात गेले. बाबाच्या मागणीनुसार 23 एप्रिल 2021 रोजी भेळ, विदेशी दारूच्या दोन बाटल्या, विडीचा बंडल व 200 रुपये घेऊन बाबाकडे गेली. पहाटे एकच्या सुमारास बाबाने उपचाराच्या नावाखाली पती व मुलांसमोर दारू पाजली.

हेही वाचा: कोरोनावर दारूच्या काढ्याचा उपाय! डॉक्टरला नोटीस

हातात तीन लिंबे देऊन एकटीला शेतात नेले. तेथे शारीरिक अत्याचार केला. तसेच, दोन वेळा पुन्हा यावे लागेल, असे सांगितले. घरी आल्यावर आपण ही घटना पतीला सांगितली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

पतीने धीर देत सिन्नर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घरातील काही व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याने याबाबत आज फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने हालचाल करून आरोपी गडाख याला अटक केली, तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

(Man arrested for torturing woman in Sangamner taluka)

Web Title: Man Arrested For Torturing Woman In Sangamner

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ahmednagar
go to top