Ahilyanagar Crime: 'दोन गावठी पिस्तुलांसह कांगोणीत एकास अटक'; स्थानिक ‘गुन्हे अन्वेषण’ची कारवाई

Kangoni Operation: संशयास्पद दिसलेल्या भारत सोपान कापसे (वय २७) यास ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने घरात लपून ठेवलेले दोन गावठी पिस्तूल व आठ जिवंत काडतूस काढून दिले. ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपीस शनिशिंगणापूर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
Local Crime Branch team arrests one person in Kangoni and seizes two country-made pistols during a police operation.

Local Crime Branch team arrests one person in Kangoni and seizes two country-made pistols during a police operation.

Sakal

Updated on

सोनई : जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी पथक कार्यरत केल्यानंतर सोनईजवळील कांगोणी (ता. नेवासे) येथे एका युवकास अटक करून विक्रीच्या उद्देशाने घरात लपून ठेवलेले दोन गावठी पिस्तूल व आठ जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. या धडाकेबाज कारवाईने वाळू, मुरूम व अवैध धंदे करताना गावठी पिस्तुलाचा वापर करणाऱ्यांत धास्ती वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com