
कोल्हार: अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याबद्दल जालिंदर तुळशीराम वांगे (वय ३८, रा. निर्मळपिंपरी, ता. राहाता) याला पाच वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश गुप्ता यांनी ठोठावली. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात जालिंदर वांगे याच्यावर २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.