esakal | क्रूर नियती! दोघांना वाचवले, पण पोटच्या मुलाला वाचवताना पित्याचाही अंत
sakal

बोलून बातमी शोधा

man who rescued the other two boys drowned along with his son in kopargaon

दोघांना वाचवले, पण पोटच्या मुलाला वाचवताना पित्याचाही अंत

sakal_logo
By
मनोज जोशी

कोपरगाव (जि. अहमदनगर) : मंडपी बंधाऱ्यावरून मुशर्तपूरकडे तिघे मित्र जात असताना बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने एक जण पडला. त्याला वाचविण्यासाठी दोघे पाण्यात उतरले. मात्र हे तिघे बुडत असल्याचे पाहून त्या तिघांपैकी एका मुलाच्या वडिलांना समजले त्यांनी ही वाहत्या पाण्यात उडी घेत इतर दोन मुलांना जीवनदान दिले. मात्र पोटचा गोळयाला वाचवत असताना बाप लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.


मुशर्तपूर शिवारातील गांजेवाडी परिसरातील मंडपी बंधाऱ्यात दुपारी साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली. संजय मारुती मोरे (वय ३५), सचिन संजय मोरे (वय १५) अशी मयत झालेल्याची नावे आहेत.

या घटनेची माहिती कळताच तहसीलदार विजय बोरुडे, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले बचाव पथकासह हजर झाले. कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष अप्पासाहेब दवंगे हे कारखान्याच्या रुग्णवाहिकेसह बचाव कार्य करणाऱ्या यंत्रणेसह हजर होऊन गावकऱ्यांच्या मदतीने दोन तासाच्या अथक प्रयत्नाने बाप लेकांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. यावेळी सरपंच पती अनिल दवंगे, तंटामुक्ती अध्यक्ष अन्वर शेख, संतोष गोसावी यांच्यासह अनेकांनी बाहेर काढण्यात मदत केली.

हेही वाचा: सख्ख्या भावंडांवर नियतीचा घाला; आई आणि बहिणीचा एकच आक्रोश

नेमके काय घडले?

मुशर्तपूर शिवाराच्या गांजेवाडी परिसरातील मंडपी बंधाऱ्यात सचिन संजय मोरे (वय १५), ओम दत्तात्रय मोरे (वय १२) व शुभम योगेश पवार हे तिघे मुले बंधाऱ्यात मासे पकडण्यासाठी गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने एकाचा तोल पाण्यात गेल्याने तो बुडू लागला त्याला वाचवण्यासाठी आरडा ओरड करीत इतर दोघे पाण्यात उतरले. पाण्याच्या वेगामुळे मुलांना पोहता येत असूनही गटांगळ्यात खात होते.

आपला मुलगा, पुतण्या व त्यांचा मित्र पाण्यात बुडत असल्याचे संजय मारुती मोरे यांच्या लक्षात येताच त्यांनी वाहत्या पाण्यात उडी मारुन शुभम पवार व पुतण्या ओम मोरे यांना पाण्यातून यशस्वी बाहेर काढून जीवदान दिले. सचिन मोरेला वाचवण्यासाठी बाप म्हणून काळजीने त्याला पाण्या बाहेर काढताना धरलेला हात निसटला. मुलगा वाहत गेला पुन्हा त्याचा पाण्यात शोध घेताना संजय मोरे व सचिन मोरे या दोघा बाप-लेकांचा पाण्यात बुडून दुर्दैवाने मृत्यू झाला.

मयत संजय मोरे यांच्या पाश्‍चात पश्‍चात पत्नी, मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. मयत सचिन हा मोठा मुलगा होता.

हेही वाचा: अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन

loading image
go to top