esakal | अहमदनगर : कोरोनाचा धोका वाढला! जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊन
sakal

बोलून बातमी शोधा

corona update 10 days of lockdown is imposed in 61 villages of ahmednagar district

अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन

sakal_logo
By
गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : कोरोनाचा संसर्ग वाढलेली 61 गावे दहा दिवसांसाठी लॉकडाऊन (Ahmednagar Lockdown) करण्यात आले आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्‍यातील सर्वाधिक 24 गावांचा यासमध्ये समावेश आहे. सोमवार (ता. 4) पासून बुधवार (ता.13) पर्यंत दहा दिवस या गावांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

कोरोनाचे जास्त रुग्ण असलेल्या गावांमध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहे. गावामध्ये पाच पेक्षा अधिक व्यक्‍तींना एकत्र येण्यास प्रतिबंध राहील. या गावामध्ये बाहेरील व्यक्‍तींना जाणे-येण्यावर प्रतिबंध राहील. नोकरीनिमित्त ज्या प्रवास करावयाचा आहे, त्यांनी परवानगी घेणे आवश्‍यक आहे. पोलिस प्रशासनाच्या मदतीने रस्ते बंद केले जाणार आहे. या गावांमधील शाळा आणि धार्मिक स्थळे बंद केले जातील. या गावातील दवाखाने, बॅंक, पतसंस्था, औषध दुकाने, कृषी सेवा केंद्रांना परवानगी राहील. किराणा दुकानांना सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत परवानगी राहील. गावातील इतर व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवावे लागतील. या गावातून मालवाहतुकीला परवानगी राहणार आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे दुभती जनावरे आहेत. त्या शेतकऱ्यांच्या गोठ्यावरूनच दुधाचे संकलन करावे लागणार आहे. या गावांमधील अंत्ययात्रा, दशक्रिया विधीसाठी तहसीलदारांची परवानगी घ्यावी लागणार आहे. या विधीसाठी फक्‍त 20 व्यक्‍तींच परवानगी राहणार आहे. लॉकडाऊन केलेल्या गावांमध्ये 18 वर्षांवरील व्यक्‍तींच्या लसीकरणास प्राधान्य दिले जाणार आहे.

हेही वाचा: धुळगावचे सुपुत्र जवान सचिन गायकवाड अनंतात विलीन!

लॉकडाऊन केलेले तालुक्यातील गावांची संख्या आणि नावे

  • अकोले (तीन)- लिंगदेव, वीरगाव, परखतपूर, कर्जत (दोन)- खांडवी, बाभूळगाव, दुमाला.

  • कोपरगाव (एक)- गोधेगाव, नेवासे (एक)- कुकाणा.

  • पारनेर (सहा)- वडनेर, कान्हूरपठार, गोरेगाव, दैठणे गुंजाळ, जामगाव, भाळवणी,

  • पाथर्डी (एक)-तीसगाव, राहाता (सात)- भगवतीपूर, पिंप्री निर्मळ, अस्तगाव, कोऱ्हाळे, लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, कोल्हार बुद्रु.,

  • संगमनेर (24)- गुंजाळवाडी, शेडगाव, निमगाव जाळी, आश्‍वी बुद्रुक, आश्‍वी खुर्द, पारेगाव बुद्रुक, पानोडी, शिबलापूर, बोटा, उंबरी, पिंपरणे, वेल्हाळे, खळी, देवगाव, घुलेवाडी, कोल्हेवाडी, वडगाव लांडगा, तळेगाव, घारगाव, चंदनापुरी, कनोली, निमोण, वडगाव पान.

  • सायखिंडी, शेवगाव (चार)- भातकुडगाव, घोटण, दहिगावने, आव्हाणे बुद्रुक.

  • श्रीगोंदे (नऊ)- लोणी व्यंकनाथ, घारगाव, बेलवंडी, मढेवडगाव, शेडगाव, येळपणे, कौठा, कोळगाव, काष्टी.

  • श्रीरामपूर (तीन)- बेलापूर खुर्द, उक्कलगाव, कारेगाव.

हेही वाचा: नाशिक : अभिनेता आस्ताद काळेंनी गोदावरीमध्ये मारली डुबकी

loading image
go to top