esakal | गुड न्यूज! पारनेर तालुक्यातील ‘मांडओहोळ’ ओव्हरफ्लो
sakal

बोलून बातमी शोधा

Mandhohol medium project overflow in Parner taluka

पारनेर तालुक्याला वरदान ठरलेला 'मांडओहोळ' मध्यम प्रकल्पाच्या मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातमध्ये आठ दिवसांपासून कमी- जास्त प्रमाणात सुरू असलेल्या पावसांमुळे हे धरण 'ओव्हरफ्लो' झाले आहे.

गुड न्यूज! पारनेर तालुक्यातील ‘मांडओहोळ’ ओव्हरफ्लो

sakal_logo
By
सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : पारनेर तालुक्याला वरदान ठरलेला 'मांडओहोळ' मध्यम प्रकल्पाच्या मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातमध्ये आठ दिवसांपासून कमी- जास्त प्रमाणात सुरू असलेल्या पावसांमुळे हे धरण 'ओव्हरफ्लो' झाले आहे. त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहत असुन, कामटवाडी, मांडवे, खडकवाडीसह धरणाखालील गावांना याचा फायदा होणार आहे.

मांडओहोळ प्रकल्प भरण्यासाठी पारनेर व जुन्नर तालुक्यांतील हद्दीवर असणारे शिंदेवाडी, पळसपुर, सावरगाव या ठिकाणी झालेला पाऊस व त्याचे छोट्या मोठ्या ओढ्यांनी वाहुन येणारे पाणी उपयुक्त ठरले आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
धरण क्षेत्रात असलेल्या कांदा, टोमॅटो तसेच फळबागांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. मांडओहळ धरणातुन टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या, काटाळवेढे व पठार भागावरील १६ गावांसाठीच्या कान्हुर पाणी योजनेतुन या गावांना पाणीपुरवठा होत आहे. यातील १६ गावांची योजना वीज बील व वीज रोहीत्र चोरी गेल्यामुळे बंद पडली आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या काळात तालुक्यातील गावांना याच मांडओहोळ प्रकल्पातुन टँकरने पाणीपुरवठा होत असतो.

असे आहे मांडओहोळ धरण 
धरणाच्या कामाला १९७७ मध्ये सुरवात झाली. सहा वर्षे धरणाचे काम सुरू होते. याचे १९८३ मध्ये काम पुर्ण झाले. धरणाची उंची २७.०७ मीटर आणि लांबी ७३९ मीटर आहे. क्षमता ३९९ दशलक्ष घनफुट आहे. धरणाला ३६२ लाख रूपये खर्च झाला होता. १९८४ पासुन परीसरातील जनतेला या धरणातुन पाणी पुरविले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या आजाराचा प्रादुर्भाव न होण्यासाठी पोलिस प्रशासनाने परीसरात पर्यटकांना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर