Ahilyanagar : मोदी साहेब, महिला सुरक्षेसाठी कडक कायदा करा; कर्नाटकतील मंजुळा यांची रायचूर ते दिल्ली पायी यात्रा

कर्नाटक राज्यातील मंजुळा दिल्लीच्या दिशेने पायी निघाल्या आहेत. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदा करण्याची मागणी करणार आहेत. त्या मंगळवारी अहिल्यानगर शहरात दाखल झाल्या.
Karnataka News
Manjula during her determined foot march from Raichur to Delhi, demanding stricter laws for women's safety in India.Sakal
Updated on

-नवनाथ खराडे

अहिल्यानगर : बालिका, मुली आणि महिलांवरील अत्याचार थांबण्यासाठी सरकारने कठोर कायदा करण्याच्या मागणीसाठी कर्नाटक राज्यातील मंजुळा दिल्लीच्या दिशेने पायी निघाल्या आहेत. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदा करण्याची मागणी करणार आहेत. त्या मंगळवारी (ता.८) अहिल्यानगर शहरात दाखल झाल्या. हा त्यांचा पायी यात्रेचा १४ वा दिवस होता. त्यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com