
अहिल्यानगर: मराठा आरक्षणासाठी संघर्षशील नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांनी आपल्या ताफ्यासह बुधवारी (ता. २७) मुंबईकडे कूच केली. या आंदोलनाला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मध्यरात्री हा ताफा नगरच्या नेप्ती चौफुला परिसरात दाखल झाला. यावेळी मराठा समाज बांधवांनी मोठा जल्लोष करून फटाक्यांची आतषबाजी केली. वाद्यवृंदात जेसीबाच्या साह्याने फुलांचा वर्षाव केला.