मराठा आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत सरकारी नोकर भरती स्थगित करावी

सुनिल गर्जे
Wednesday, 23 September 2020

मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत सरकारी नोकर भरती स्थगित करावी, अशी मागणी मराठा सकल समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे नेवासे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
 

नेवासे (अहमदनगर) : मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत सरकारी नोकर भरती स्थगित करावी, अशी मागणी मराठा सकल समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे नेवासे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
 
नायब तहसीलदार संजयसिह परदेशी यांनी स्वीकारलेल्या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. त्या आदेशानुसार मराठा समाज आरक्षणाला स्थगिती दिली असल्याने राज्य सरकारने जवळपास 12 हजार जागांसाठी पोलिस भरती प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. ती पोलिसभरती प्रक्रिया थांबवावी. तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा समाज आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत राज्य सरकारने कुठल्याही प्रकारची नोकर भरती करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
यावेळी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, शहराध्यक्ष मनोज पारखे, ॲड.जी.डी. खिळदकर, अनिकेत वाघ, शशिकांत पारखे, विठ्ठल शिंदे, दादासाहेब आगळे, गणेश गायके, महेश आरले, प्रशांत वाघ यांनी निवेदन दिले.

संपादन : सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Maratha community has demanded that the recruitment of government servants be postponed