
अहिल्यानगर: सकल मराठा समाजाचा मोर्चा बुधवारी सायंकाळी नगरमध्ये धडकणार आहे. पैठण मार्गे शेवगाव, मिरी-माका, पांढरीपूल, शेंडी बायबास मार्गे कल्याण रोडवरील नेप्ती चौकातून हा मोर्चा जाणार आहे. शेंडी बायपास चौक, तसेच कल्याण रोडवरील नेप्ती चौकात मनोज जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत होणार आहे. त्यानंतर मोर्चा मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातून सुमारे दहा हजार वाहने या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी दिली आहे.