Huge Support from Maratha Sevaks; Jarange Patil to be Felicitated Across VillagesSakal
अहिल्यानगर
मराठा सेवकांच्या बैठकीत निर्णय! 'मोर्चाचे गावागावांत मनाेज जरांगे पाटील यांचे होणार जंगी स्वागत'; मुंबईकडे रवाना होणार
Huge Support from Maratha Sevaks: शहरातील क्रांती चौकात बॅनर व व्यासपीठ उभारून जेसीबीच्या साहायाने फुलांची उजळण करून क्रेनने हार घालून जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. तालुक्यात ठिकठिकाणी कमानी व बॅनर लावण्यात आले आहेत.
शेवगाव: तालुक्यामध्ये मराठा सेवकांच्या आयोजित बैठकीत शहर व तालुक्यात मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली. शेवगाव शहरासह तालुक्याच्या हद्दीमधील रोडवरील गावात कमानी लावून स्वागत करण्यात येणार आहे.