सुगीसाठी मराठवाडा, विदर्भाचे मजूर

ऊसतोड कामगारांसारख्या टोळ्या नगरमध्ये दाखल
सुगीसाठी मराठवाडा, विदर्भाचे मजूर
सुगीसाठी मराठवाडा, विदर्भाचे मजूरsakal

नगर तालुका : ज्वारीचे आगार असलेल्या नगर तालुक्यात या वर्षी अवकाळी पाऊस व विपरीत हवामानामुळे ज्वारीची पेरणी १५ टक्के कमी झाली आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. ग्रामीण भागात धान्य व जनावरांच्या पौष्टिक चाऱ्यावर (कडबा) मोठा परिणाम होणार आहे. दुसरीकडे, ऐन सुगीत मजुरांची टंचाई जाणवत असल्याने, थेट वाशीम, परभणी येथून ज्वारीच्या काढणीसाठी मजूर आणावे लागत आहेत.

नगर तालुक्यातील बहुतांश शेतमजूर लाल कांद्याची काढणी, गावरान कांद्याची लागवड व मशागतीच्या कामात गुंतले असल्याने, नगर तालुक्यातील ज्वारीच्या काढणीस विलंब होत आहे. गावात मजूर मिळत नसल्याचे चित्र सध्या तालुक्यातील गावागावांतून दिसत आहे.

भल्लरी, इर्जिक झाली इतिहासजमा

ग्रामीण भागात पूर्वी शेतकरी आपल्या सहकाऱ्यांसह पेरणी, काढणी, खळ्यासाठी इर्जिक घालायचे. ज्याच्या शेतात इर्जिक आहे, तेथे डफावर भल्लरी म्हणत एकमेकांना प्रोत्साहन दिले जात असे. यजमान शेतकरी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना सुग्रास भोजन देत. मात्र, काळाच्या ओघात भल्‍लरी, इर्जिक इतिहासजमा होत आहे.

परजिल्ह्यांतील काही भागात मजुरांनी ऊसतोडणी कामगारांसारख्या टोळ्या ज्वारी काढणीसाठी तयार केल्या आहेत. सूर्यास्त होताच ही मंडळी कामाला जुंपतात. रात्री उशिरापर्यंत काम करून शेतावरच या मजुरांची टोळी मुक्काम करते.

- रामेश्‍वर म्हस्के, शेतकरी, उक्कडगाव

वाशीम व परभणीतील मजुरांच्या प्रवासासाठी खासगी वाहन, त्यांची राहण्याची व जेवणाची सोय ज्वारी काढायची असलेल्या शेतकऱ्याला करावी लागते. तालुक्यात अद्यापि कांदालागवडीची कामे संपली नाहीत. शिवाय, कांदालागवडीत मजुरी चांगली मिळत असल्याने, मजूर त्या कामाला जास्त प्राधान्य देतात.

- अशोक कोकाटे, शेतकरी, चिचोंडी पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com